Maharashtra

कोरोना संकटाच्या काळात धुळे शहरातील गरजुंना चहा-बिस्कीट वाटप समाजसेविका मोनिका शिपी याचां मदतीचा एक हात

कोरोना संकटाच्या काळात धुळे शहरातील गरजुंना चहा-बिस्कीट वाटप
समाजसेविका मोनिका शिपी याचां मदतीचा एक हात

प्रतिनिधी विक्की खोकरे

धुळे-कोरोना नामक विषाणुच्या पार्श्वभुमीवर शहरात शासनाच्या आदेशानुसार नैसर्गिक आपत्तीत संचारबंदी काळात कर्तव्यास जागत बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व परप्रांतीय नागरिकांना ‘मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा तथा पत्रकार श्रीमती मोनिकाताई शिंपी यांचे तर्फे शहरातील कालिंका माता मंदिर परीसर,नुरानी मस्जिद,देवपुर,अग्रवाल विश्राम भवन परीसर व दाता-सरकार दर्ग्याजवळील लहान पुलावर चहा व बिस्किट वाटप करण्यात आले.
सध्या ‘कोरोना, संसर्गाचे पर्व चालु असताना आपला जीव धोक्यात घालुन, जीवाची तमा न बाळगता पोलिस बांधव आपल्या कर्तव्यावर हजर असतात तसेच कोरोना पर्वामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन चे पालन होत असल्याने व प्रवास तसेच वाहतुक बंद असल्यामुळे परप्रांतीय नागरीकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ‘कुठेना -कुठे माणुसकी जागी, असल्याचा प्रत्यय या घटनेतुन आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button