Chopda

लासूर मध्ये ही विनाकारण फिरणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी केली कारवाई, १० हजार दंड वसूल

लासूर मध्ये ही विनाकारण फिरणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी केली कारवाई, १० हजार दंड वसूल

योगेश पवार चोपडा

चोपडा : दि. १५ रोजी सायंकाळी ४.१५ ते ६.०० वाजे दरम्यान चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार व प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर येथील आरोग्य सहाय्यक यांचे मदतीने लासुर गावातील ग्रामपंचायत बाजार चौकात ४८ नागरीकांची रॅपिड टेस्ट करून घेतली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.तसेच विनामास्कच्या ३०

ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून ६,००० रुपये दंड व मोटार वाहन कायद्याखाली २० केसेस करून ४,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. एकुण ५० केसेस करून १०,००० रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक

सपोनि.संदिप आराक व पोलीस कुमक मार्फत ही कारवाई करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button