सावदा येथे तलवारसह आरोपी गजाआड ..
प्रतिनिधी/युसूफ शाह
सावदा (सा वा) येथील शहरात दि. 15/आँक्टोबर /2020 रोजी रात्री 9.30 वा. सावदा ते फैजपुर रोडवरील लेंडी नाल्याजवळ छट्टू शेखलाल गवळी वय 29 राहणार शिरपूर. कन्हाळा. तालुका भुसावळ. हा त्याचे कब्जात गैरकायदा 2000 रुपये किमतीची एक लोखंडी तलवार बाळगत असताना, मिळून आला. म्हणून सावदा पोलीस स्टेशन येथे आर्म एक्ट 04/25 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक बापू रोहम स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर भाग, सपोनि वानखेडे सावदा पोस्टे पीएसआय आरडी पवार, ASI राजेंद्र पाटील, पोहेका रवी नरवाडे,अनिल इंगळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा संजीव चौधरी,देवेंद्र पाटील, विशाल खैरनार सावदा पोस्टे यांनी संयुक्तरीत्या केली आहे.






