Amalner

Amalner:मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द, डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब

Amalner:मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द,

डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब

अमळनेर:- मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निम-कळमसरे परिसरासाठी विकासाचा सेतू ठरू पाहणाऱ्या निम मांजरोद पुलाचे काम रद्द झाल्याचा आरोप निम येथील सामाजिक कार्यकर्ते मगन भाऊसाहेब यांनी केला आहे.
निम व परिसरातील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या दूरदृष्टीमुळे निम मांजरोद पुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. त्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धरणास ८२ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लोकप्रतिनिधी बदलल्याने काम थंड बस्त्यात पडले. शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांनी ह्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने काम रखडले आणि पुलासाठी असलेली तरतूदच रद्द करण्यात आली. मात्र बाजूच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तापी पाटबंधारे विभागामार्फत निधी खर्चून खेडी भोकरी पुलाचे काम करून घेतले. यावरून स्थानिक प्रश्नाविषयी आजी माजी आमदारांच्या मनात अनास्था दिसून येते.

*ह्या पुलामुळे झाला असता परिसराचा विकास,*

निम मांजरोद पुलाचे काम झाले असते तर शिरपूर आणि अमळनेर तालुका जोडला जाणार होता. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीसाठी अमळनेर बाजार समितीत येऊन तालुक्याच्या अर्थकारणाला अजून बळ मिळाले असते. तसेच शिरपूर जाण्यास जवळचा रस्ता मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर दळणवळण सुरू झाले असते. निम कळमसरे भागातील उद्योगधंद्यांना चालना मिळून स्थानिक भागात रोजगार निर्माण झाला असता.

*डॉ. शिंदे निवडून पुलाचा प्रश्न मार्गी लावणार*
आजी माजी आमदारांना आपण अनुभवले आहे, मात्र यावेळी डॉ. अनिल शिंदे यांना निवडून दिल्यास ह्या पुलासह अनेक स्थानिक प्रश्न मार्गी लागणार असे मगन भाऊसाहेब यांनी सांगितले असून त्यांनाच भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button