Amalner: शॉर्ट सर्किटमुळे दुकाने जळून खाक…
अमळनेर शॉर्ट सर्किटने जुन्या बसस्थानक परिसरात दोन दुकाने आगीत जळून खाक झाल्याची घटना १६ रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली. दोन महिन्यांत दुसरी घटना…आगीत दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र भावराव जगताप ( रा. झामी चौक) यांचे फायनल प्लॉट १२३ मध्ये दुकान असून दि १६ रोजी रात्री त्यांच्या दुकानातून धूर निघत असल्याचे शेजारच्या दुकानदाराने कळवले. दुकानात येईपर्यंत दोन दुकानांनी पेट घेतला होता. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असल्याने वीज कर्मचाऱ्यांना विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी बोलावण्यात आले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने अग्निशमन दलाची वाहने येऊन ठेपली होती. मात्र वायर स्पकिंग होत असल्याने पाणी मारणे देखील धोकेदायक होते. बऱ्याच वेळेनन्तर आपोआप वायर जळून विद्युत प्रवाह कट झाला.
उशिराने वायरमन आले आणि डीपी बंद केली. त्यांनंतर नितीन खैरनार, फारुख शेख, जफर खान, दिनेश बिऱ्हाडे, आंनदा झिम्बल यांनी आग विझवली. राजेंद्र जगताप यांच्या श्रीराज वेल्डिंग दुकानातील वेल्डिंग मशीन, कटर, ड्रिल मशीन जळून तर शेजारील रोहिदास हिम्मत शिंगाणे यांच्या कल्पेश सर्व्हिस सेंटर मधील १७ एलईडी, १० टीव्ही, ४ विद्युत शेगड्या, १५ होम थिएटर व फनिंचर असे सुमारे दोन्ही दुकाने मिळून दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.






