Yawal

शिरसाड ग्रा.प.सदस्यांनी सादर केली विकासाची ब्ल्यू प्रिंट

शिरसाड ग्रा.प.सदस्यांनी सादर केली विकासाची ब्ल्यू प्रिंट

यावल :- (शब्बीर खान ) 15 व्या वित्त आयोगाच्या सन 2023-24 या कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात 8 ऑगस्ट 2022 गावाची ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावातील वार्ड क्रमांक 4 मधून निवडून आलेले तेजस धनंजय पाटील व ज्योती प्रवीण सोनवणे या दोन सदस्यांनी लेखी स्वरूपात सर्व सभागृहासमोर संपूर्ण गावाचा विकास कशाप्रकारे या 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून करता येईल. अशी डिजिटल ब्ल्यू प्रिंट सादर केली. यामध्ये गावाचा सर्वांगीण विकास व गाव डिजिटल करण्या संदर्भात मुद्दे मांडण्यात आले. सदर ब्ल्यू प्रिंट मधील मुद्दे ग्रामसभेत वाचून दाखवण्यात आले. त्यावर सर्व गावकऱ्यांनी मुद्दे विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असून त्याचा 15 व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात समावेश करण्यात यावा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सदरील ब्लू प्रिंट शेतकरी, महिला वर्ग आणि तरुण वर्ग यांना समोर ठेवून तयार करण्यात आली असे ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी गावाचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, काही सदस्य व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थित होता. या आधी देखील मागच्या विकास आराखड्याच्या वेळी दोघं सदस्यांनी या प्रकारच्या कामाची ब्ल्यू प्रिंट सादर केलेली होती. या सर्व कामाचे सर्व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button