India

Instagram Breaking: इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी खुशखबर…इंस्टाग्राम ने आणले हे तीन नवीन फिचर्स..

Instagram Breaking: इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी खुशखबर…इंस्टाग्राम ने आणले हे तीन नवीन फिचर्स..

इंस्टाग्राम ने नवीन फिचर्सला लाँच केले आहे. हे नवीन फिचर्स युजर्स साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.

  • लाईव्ह लोकेशन शेअरिंग

इंस्टाग्रामने लाईव्ह लोकेशन शेअरिंगची सुविधा आणली आहे. यामुळे युजर्स मित्रांसोबत लोकेशन शेअर करू शकतात. कोणत्याही इव्हेंट, कार्यक्रम किंवा गजबजलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

युजर्स एक तासासाठी लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात.
• लोकेशन शेअर करताना फक्त संबंधित चॅटमधील व्यक्तींनाच ती माहिती दिसणार आहे. • चॅटवर एक नोटिफिकेशन दिसेल, ज्यामुळे युजर्सला लोकेशन शेअरिंग सुरू असल्याचं लक्षात राहील.
• ही सुविधा सध्या काही निवडक देशांमध्ये उपलब्ध असून, भविष्यात इतर देशांमध्येही लवकरच पोहोचणार आहे.

  • निकनेम्सचा पर्याय

इंस्टाग्रामने आता चॅटिंगला अधिक वैयक्तिक करण्यासाठी निकनेम्सचा पर्याय दिला आहे. युजर्स आता आपल्या मित्रांसाठी मजेशीर किंवा वैयक्तिक टोपणनावे ठेवू शकतात.
चॅटच्या टॉपवर “Nicknames” पर्याय निवडून मित्रांसाठी निकनेम सेट करता येईल. हे निकनेम्स फक्त DM चॅटमध्ये दिसतील आणि इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याचा परिणाम होणार नाही. कोणत्याही वेळी निकनेम्स बदलता येतील आणि चॅटमध्ये कोण बदल करू शकतो हे देखील ठरवता येईल.

  • ३०० हून अधिक नवीन स्टिकर्स

युजर्ससाठी इंस्टाग्रामने १७ नवीन स्टिकर पॅक्स आणले आहेत. यामध्ये ३०० हून अधिक मजेशीर स्टिकर्स आहेत. मित्रांसोबत शेअर केलेले स्टिकर्स सेव्ह करून पुन्हा वापरता येणार आहेत. हे स्टिकर्स चॅटिंग अधिक मजेशीर आणि सर्जनशील बनवतील.
ही फिचर्स इंस्टाग्रामने त्याच्या प्रतिस्पर्धी ॲप्स जसे की Snapchat यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आणली आहेत. लाईव्ह लोकेशन शेअरिंग, वैयक्तिक टच देणारे निकनेम्स, आणि स्टिकर्समुळे इंस्टाग्राम युजर्ससाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button