Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना Update.. रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केले नवीन आदेश जारी..

?जळगांव Live.. कोरोना Update.. रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केले नवीन आदेश जारी..

जळगांव सौम्य / अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीक
रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल करणेबाबत तसेच अपवादात्मक परिस्थितीत घरी विलगीकरणाचा पर्याय व गृह उपचार करण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भिय परिपत्रकानुसार सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
सौम्य / अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल न करता कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येत
आहेत. तसेच ऑक्सिजनची आवश्यकता नसतांना देखील DCHC, DCH मध्ये या रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. तरी याबाबत सर्व संबंधितांना खालील प्रमाणे सुचना निर्गमित करण्यात
येत आहेत.
1) सौम्य/अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल करण्यात यावे.
2) DCHC मध्ये केवळ ऑक्सिजनची गरज असलेले कोविड पॉझिटीव्ह / संशयीत रुग्णांवर उपचार करावा.
3) DCH दर्जाच्या रुग्णालयात अत्यवस्थ / आयसीयु रुग्णांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच 02 वर असणा-या परंतु स्थिर रुग्णांना DCHC मध्ये संदर्भित करावे.
वरील प्रमाणे सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतची जबाबदारी अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव व जिल्हा शल्य चिकीत्सक जळगांव यांची राहील. तसेच याबाबत उल्लंघन होत असल्यास
संबंधितांवर भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button