Amalner

Amalner: अपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि मनुष्यबळ ठरणार नागरिकांना घातक… प्रसूती झालेल्या महिलेला योग्य वेळी मिळाली नाही रुग्णवाहिका आणि उपचार…

Amalner: अपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि मनुष्यबळ ठरणार नागरिकांना घातक… प्रसूती झालेल्या महिलेला योग्य वेळी मिळाली नाही रुग्णवाहिका आणि उपचार…

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून मनुष्यबळाअभावी परिसरातील रुग्णांचे हाल होत आहेत. एक प्रसुती झालेली महिला अत्यवस्थ स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली असता त्याठिकाणी कोणताही कर्मचारी नसल्याने सदर महिला उपचाराअभावी काही तास ताटकळत राहिली व शेवटी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली.

झाले असे की, बोदर्डे येथील बानू रवींद्र भील या महिलेस प्रसुतीकळा सुरुझाल्याने नातेवाईकांनी १०८ क्रमांकाला फोन लावून पातोंडा येथून अ‍ॅँबुलन्स बोलावून मांडळ येथील प्र्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले. बानू भिल ह्या घरीच प्रसुती झाल्या होत्या, मात्र नाळ पोटातच अडकल्याने त्या अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी मांडळ येथे आणले होते. मात्र याठिकाणी डॉक्टर, पारिचारीका आदींपैकी कोणीही कर्मचारी नसल्याचे नातेवाईकांनी सांगत संताप व्यक्त केला. शेवटी त्या महिलेस अमळनेर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले गेले. तिथे उपचार केल्यानंतर महिलेची प्रकृती बरी झाली.

मांडळ येथे वेळेवर उपचार न मिळाल्याने नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीही मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात एका जळीत रुग्णावर कर्मचा-यांविना उपचार मिळाला नव्हता, त्यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी स्वत: केंद्रात भेट देऊन सदर प्रकरणाची पाहणी करुन चौकशी केली होती.

सदर महिलेची प्रसुती बोदर्डेला झाली होती आणि नाळ ही शरीरातच अडकली होती. त्यामुळे तिला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांचा मांडळ येथे पारिचारीकेच्या हातूनच उपचार व्हायला हवा असा आग्रह होता. मात्र मांडळ येथे तीन जागा रिक्त असल्याने मनुष्यबळाचा अभाव आहे. हीच परिस्थिती संपूर्ण तालुक्याची आहे. तालुक्यात ३३ उपकेंद्र आणि ५ प्र्रा. आ. केंद्र असून प्र्रत्येकी एक अशा ३८ पारिचारीका अपेक्षित आहेत, मात्र फक्त १४ पारिचारिका असून प्रत्येक आरोग्य केंद्रात मनुष्यबळाचा अभाव आहे. पातोंडा प्रा.आ. केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र आहेत, मात्र त्याठिकाणी फक्त दोनच पारिचारिका उपलब्ध आहेत. ढेकूलाही आठपैकी तीन, मारवडला आठपैकी चार, जानवेला सहापैकी तीन पारिचारीका उपलब्ध आहेत.
-डॉ. गिरीश गोसावी,
तालुका वैद्यकीय अधिकारी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button