Ratnagiri

महादंडनायक वीर एकलव्य जयंती दापोलीत साजरा. जयंतीनिमित्त वीर एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन

महादंडनायक वीर एकलव्य जयंती दापोलीत साजरा.
जयंतीनिमित्त वीर एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन

रत्नागिरी : आज महाशिवराञीबरोबरच महादंडनायक वीर एकलव्य जयंतीनिमित्त दापोलीत वीर एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन पांगारवाडी येथे करण्यात आले.प्रतिमेचे पूजन करताना सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल, पिंगला पावरा,अमोल पावरा , परी पावरा व पांगारवाडीतील काही बांधव व बालमंडळी उपस्थित होती.
महाभारतात वीर एकलव्याचे पाञ विशेष म्हणून ओळखले जाते.जेव्हा जेव्हा गुरू शिष्याची चर्चा केली जाते.तेव्हा एकलव्य व द्रोणाचार्य यांची नावे समोर येतात. पूर्वीच्या काळी गुरुकुल आश्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असत.एकलव्य हे भिल्ल आदिवासी समाजाचे म्हणजेच शूद्र असल्यामुळे गुरू द्रोणाचार्य यांनी त्यांना आपल्या आश्रमात शिक्षण द्यायला नकार दिला. वीर एकलव्य हे एका शिकारीचे पूत्र असल्यामुळे लहानपणापासूनच धनुष बाण चालवण्यात तरबेज होते.धनुष्य बाण चालवणे ही त्याची आवड होती. म्हणून एकलव्याने गुरू द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून त्याची पूजा करत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनून दाखवले. त्यांचे गुरूवर अपार श्रद्धा होती. गुरू द्रोणाचार्य यांनी गुरूदक्षिणा म्हणून वीर एकलव्य यांचा अंगठा कापून मागितला होता.तेव्हा मागे पुढे काहीही विचार न करता एकलव्याने आपल्या हाताचा अंगठा कापून दिला.तेव्हा पासून वीर एकलव्य यांना श्रेष्ठ शिष्य म्हणून ओळखले गेले.अर्जून पेक्षाही धनुविद्येत एकलव्य श्रेष्ठ होता.हे काही प्रसंगाद्वारे सांगण्यात येते.
अश्या महान शिष्याच्या व्यक्तीमत्वातून आपल्याला आदर्श घेण्याची शिकवण मिळते. वीर एकलव्य जयंतीनिमित्त सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button