संस्था, शाळेस अडथळे निर्माण करणारे! सलीम खान यांना संस्थेतून बेदखल करण्याची हालचालींना वेग संस्था एक्शन मोड मध्ये
युसुफ शाह सावदा
सावदा : जळगांव जिल्हयातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद सोसायटीने एकाकडे नविन अद्यावत इमारत बांधुन शाळे करीता उपलब्ध करून दिली असतां या कामांत सहभागी न होता संस्थेत उपाध्यक्ष पदावर असलेले सलीम खान यांनी दुसरी कडे थेट ३० वर्षा नंतर शाळेसाठी बांधलेली नविन अदयावत इमारत पाडण्याची मांगणी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करुन केली व तसेच सदरील रद्द झालेली याचिकेचा आधार घेऊन त्यांनी स्वत: ला हवे असलेले अर्थ लावून काही दिवसा पूर्वी घेतलेली पत्रकार परिषद मध्ये संस्था व शाळा विरोधी भुमीका मांडली या मुळे शैक्षणिक क्षेत्रात व गावातील नागरीक सहीत पालक वर्गात संतापाची लाट पसरली या नंतर शाळा विरोधी भुमीका घेणाऱ्या सलीम खान अ रज्जाक खान यांना संस्थेतून कायम स्वरुपी बेदखल करण्याची मागणी देखील येथील पालक वर्गा तर्फे निवेदनाद्वारे संस्था मंडळ कडे त्यावेळीं करण्यात आली होती
तसेच विषेशकर इमारत संदर्भात गावातील ज्या समाजसेवकांनी गैर समज वरुन बांधकामाबाबत नगर पालिकेत तक्रारी केल्या होत्या त्यानी शाळा,व विद्यार्थ्याी हितासाठी तक्रारी मागे घेतल्या आहेत व ते आता संस्थेला विकासासाठी साथ देत आहेत. यांचे कौतुक केले तेवढेकमी व दुसरी कडे संस्थेत जबाबदार व्यक्तीं सलीम खान यांनी घेतलेली विरोधी भुमीकेची तुलना केली असता त्यांना संस्थेतुन बेदखल करणेच योग्य असलेल्याचे मत इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी चे संचालक मंडळ तर्फे वेक्त करण्यात आले
तरी समाजहित व विद्यार्थ्याीहित न बघणाऱ्या सलीम खान, यांना संस्थेमधुन संचालक व उपाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करणे बाबत ची ठोस कारवाई संस्था मंडळ तर्फे लवकरच करण्यात येणार असल्या बाबतची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्या ने या संदर्भात अधिक माहिती घेणे कामी थेट
इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी चे संचालक मंडळाशी संपर्क साधले असता त्यांनीे हकालपट्टीची बाबला दुजोरा देवून सांगीतले की शाळा व संस्थेस अडचणीत आण्णयासाठी केविलवाणी प्रयत्न करणाऱ्या श्रीमान सलीम खान यांची संस्थे मधुन कायमची उचलबांगडी करणे बद्दल लवकरच कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केले जाईल व या विषयी संस्था लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे सुद्धा म्हटले आहे






