Amalner

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी सौ.भारती सोनवणे अमळनेर यांची निवड…

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी सौ.भारती सोनवणे अमळनेर यांची निवड…

अमळनेर

अमळनेर : राज्यातील नाभिक समाजाचे मातृ संघटन असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक राज्याचे अध्यक्ष मा.श्री. कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्याध्यक्ष दामोदरराव बिडवे यांच्या प्रमुख उपस्थिति मधे औरंगाबाद येथे पार पडली. बैठकीमधे समाज हिताच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व ठराव पारित करण्यात आले. येणाऱ्या काळात नाभिक समाजाचा अनुसूचित जाती मधील आरक्षणाचा मुद्दा आणखी तीव्र करणार असून त्यासाठी स्वतंत्र समिति गठित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अध्यक्ष तथा ओबीसी नेते मा.श्री. कल्याणराव दळे यांनी केली.
यावेळी अमळनेर येथील प्रसिद्ध समाज सेविका व उद्योजिका सौ.भारती संजय सोनवणे अमळनेर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे तथा कार्याध्यक्ष दामोदरराव बिडवे यांच्या प्रमुख उपस्थिति मधे निवडीचे पत्र देऊन राज्य कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर राज्याचे सरचिटणीस पांडुरंगजी भवर, कार्यकारी चिटनीस रेनुकादासजी वैद्य, उपाध्यक्ष भगवानराव वाघमारे, युवक अध्यक्ष सुरेंद्रभैया कावरे, कर्मचारी प्रदेश अध्यक्ष उत्तमराव सोलाने, संपर्क प्रमुख किशोरभाऊ सूर्यवंशी, चिटनीस सतीशजी जयकर,विभागीय अध्यक्ष नाना शिरसाठ, राज्याचे महिला संघटक संध्याताई पारवे,महिला सरचिटणीस ऍड. मोनिका निकम व संपूर्ण राज्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button