Sangali

?धक्कादायक..MPSC-UPSC मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने युवतीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक..विश्वास कोणावर ठेवावा.!!

?धक्कादायक..MPSC – UPSC मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने युवतीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

कडेगाव (जि. सांगली) :
कडेगाव येथे 28 वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी कडेगाव पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस हा आज सकाळी कडेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (police inspector arrested in rape case at kadegaon sangli) त्यामुळे पीडित तरुणीच्या कुटुंबासह लोकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिचावर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलिस निरीक्षक हसबनिस यांच्या विरोधात संबंधित पीडित तरुणीने कडेगाव पोलिस ठाण्यात दिली होती.

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस याच्याविरुद्ध 28 ऑगस्ट 2020 रोजी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने हसबनिस याचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर हसबनिस याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज देखील 2 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान आज कडेगाव पोलिस ठाण्यात हसबनिस हा हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 3 महिन्यानंतर हसबनिस अटकेत आला आहे. त्यामुळे लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.

या गुन्ह्याचा तपास सध्या तासगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे या करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button