Maharashtra

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्या रविवारी (दि. ०९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्या रविवारी (दि. ०९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन

रफिक आतार

पंढरपूर- नुकताच दहावी बोर्डचा रिझल्ट लागलेला असून सध्या कोरोना महामारीमुळे पुढील प्रवेशासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे, साहजिकच पुढील प्रवेशाबाबत कोणत्याही हालचालीही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे बनलेले आहे आणि नेमका हाच धागा पकडून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन व्हावे या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक विश्वात ‘पंढरपूर पॅटर्न’ द्वारा लक्षवेधी कामगिरी करत असलेल्या स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर फेसबुक लाईव्ह द्वारे बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत. उद्या रविवारी (दि.०९ ऑगस्ट २०२०) रोजी सकाळी ११.०० वाजता हे ऑनलाइन मार्गदर्शन सत्र स्वेरी व विद्याभारती (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आल्याची माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी दिली. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे योग्य करिअर व्हावे, त्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा मिळावी या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सर मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन स्वेरीच्या फेसबुक पेज वरून लाईव्हच्या माध्यमातून http://www.facebook.com/svericampus/live या लिंकद्वारे पाहता येणार आहे. या मार्गदर्शन सत्राबद्दल अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. एस. एस. गायकवाड (मोबा. क्रमांक. -९८९०५६६२८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छायाचित्र -स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरी लोगो व डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button