Amalner: मनसे तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोदिनी पाटील यांचे अभिनंदन…
अमळनेर प्रताप हायस्कूलच्या शिक्षिका प्रमोदिनी पाटील यांना महावीर इंटरनॅशनल या संस्थेने काल दिनांक 4 /9/ 2022 रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.ही संस्था निस्वार्थपणे सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करणारा व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करणे हे खूप महत्त्वाचे कार्य करत आहे. अमळनेर मनसे परिवारतर्फे प्रमोदिनी पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष धनंजय साळुंखे अल्पसंख्याक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.






