Bollywood

मोगलमर्दानी महाराणी ताराबाई हा पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!पहा काय आहे चित्रपट..!

मोगलमर्दानी महाराणी ताराबाई हा पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..!पहा काय आहे चित्रपट..!

मुंबई मराठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती आणि संभाजी महाराज यांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे.महाराणी ताराबाई यांच्या कार्याची ओळख व्हावी आणि त्यांचे शौर्य, पराक्रम मोगलांना त्यांची जागा दाखवत महाराष्ट्रातुन हाकलून लावणाऱ्या महाराणी ताराबाईंचा इतिहास परिचित व्हावा या अनुषंगाने “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हा जगातील पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट असणार आहे जो मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होईल.शौर्य, धैर्य अन् पराक्रमाची ज्वलंत आख्यायिका सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी छत्रपती ताराराणींची भूमिका साकारणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स, ब्लॅक हँगर स्टुडिओ आणि ओरवो स्टुडिओज् यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लॉन्च झालं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव करणार असून कथा लेखन आणि संवाद लेखन डॉ सुधीर निकम यांनी केलं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाईल.

तर सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ नोव्हेंबर पासून महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे हि ताराराणींची भूमिका निभावणार आहे. छोट्या पडद्यासोबतच आता मोठ्या पडद्यावर देखील प्रेक्षकांना महाराणी ताराराणी यांचा इतिहास समजणार आहे त्यामुळे याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button