Amalner

Amalner: रणधुमाळी 20241 डॉ.अनिल शिंदेंना मोठया मतांनी विजयी करा,पारोळा येथील सभेत मा.शरदचंद्रजी पवार यांची भावनिक आवाहन….

Amalner: रणधुमाळी 20241 डॉ.अनिल शिंदेंना मोठया मतांनी विजयी करा,पारोळा येथील सभेत मा.शरदचंद्रजी पवार यांची भावनिक आवाहन….

आज पारोळा येथे माजी केंद्रीय मंत्री मा.शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांची निशाणी हाताचा पंजा आहे. डॉ अनिल शिंदे यांना मोठ्या मतांनी विजयी करा अशी शरद पवार यांनी विनंती केली,आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र मध्ये नऊशे शेतकरी आत्महत्या झाली आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का करतो ? तरूणांना नोकऱ्या नाहीत, असा सवाल शरदचंद्रजी पवार यांनी उपस्थित केला,या देशात महिलांवर अत्याचार केला जातो.लहान मुले वर अत्याचार केले जाते.शेतकरी कर्ज बाजारी आहे अशी अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे.
शरद पवार म्हणाले की जवळचा मतदारसंघातील उमेदवार डॉ अनिल शिंदे चांगले नेतृत्व आहे. उच्चशिक्षित आहेत, अतिशय साधा भोळा माणूस आहे. अमळनेकरांनी मोठ्या मतांनी डॉ.अनिल शिंदे यांना विजय करा अशी भावनिक साद घातली यावेळी डॉ शिंदे यांनी शरदचंद्र पवार यांच्या पाया पडतांना भावनिक होत डॉ शिंदे यांना अश्रू अनावर झालेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button