पुणे प्रतिनिधी
पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सौ.वैष्णवी ताई पाटील याचे आपल्या टिम सोबत मदतीपासून वंचित असलेली पूरग्रस्त गावे यांच्या साठी सलग गेल्या ३ दिवसापासून मदत कार्य चालू केले आहे.
सध्या अतिवृष्टी मुळे सांगली , सातारा , कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे…!!
कित्येक लोकांना वेळेवर मदत न मिळाल्याने पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर सध्या बरीच कुटुंब आपल्या घरांच्या दुरवस्थामुळे उघड्यावर आहेत.
सांगली , कोल्हापूर , सातारा विभागातील यां पूरग्रस्त बांधावाना मदतीची सक्त गरज आहे.
यां परिस्थितीची व माणुसकी जाणीव ठेऊन पर्यावरण मित्र संघटना,भारत यां संपूर्ण भारत देशांत पर्यावरण संरक्षण चे निस्वार्थ कार्य करणाऱ्या संस्थेचे विविध विभागातील पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सौ.वैष्णवी ताई पाटील या पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा पदावर असून आपल्या कुटुंबासमवेत व कोल्हापूर येथील टिम सोबत गेले ३ दिवसा पासून पूरग्रस्तांसाठी त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी , त्यांना सध्या कोणत्या वस्तू ची नितांत गरज आहे हे पाहून त्यांना अशा प्रत्येक प्रकारची मदत करण्याचे कार्य करीत आहेत.
तसेच कोल्हापूर , सांगली येथील पूरग्रस्तांसाठी यां नंतरही आवश्यक त्या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकारी मार्फत प्रत्यक्ष भेट देऊन उपजीविकेच्या वस्तू , साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे यांनी दिली आहे.







