सावदा पालिकेचा प्रभागानुसार आरक्षण जाहीर
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पालिकेत शासन व उच्च न्यायालयाचे आदेशान्वये आज दि.१३ जुन २०२२ रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत शहराची लोकसंख्या नुसार एकूण १० प्रभाग असून त्यामध्ये २० लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे असल्याने सदरील प्रभागनिय सोडत प्रशासकीय अधिकारी कैलास कडलक व मुख्याधिकारी किशोर चव्हाण आणि कार्यालयीन अधिक्षक सचिन चोडके यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.याप्रसंगी ६ वी उत्तीर्ण श्लोक ज्ञानेश्वर भारंबे या विद्यार्थ्याच्या हस्ते प्रभाग क्रं.५ अ हा अनुसुचित जाती महिला राखीव सोडत प्रशासकीय अधिकारी कैलास कडलक यांनी जाहीर केल्यानंतर उर्वरित आरक्षण खालील प्रमाणे असे,
प्रभाग क्रं.१ मध्ये १अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्र. क्रं.२ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण
प्र. क्रं.३ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण
प्र. क्रं. ४ अनुसूचित जाती(एस.सी), ब सर्वसाधारण महिला
प्र. क्रं. ५ अनुसूचित जाती महिला(एस.सी), ब सर्वसाधारण
प्र. क्रं. ६ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण
प्र. क्रं. ७ अनुसूचित जमाती(एस.टी), ब सर्वसाधारण महिला
प्र. क्रं. ८ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण
प्र.क्रं. ९ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
प्र. क्रं. १० सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण
येणेप्रमाणे प्रभागनिय दिनदर्शिकेवर पालिका कर्मचारी सतीश पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे सोडत जाहीर लिखाणाचे कामकाज केले.यावेळी माजी नगरसेविका सुभद्राबाई बडगे,शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी उर्फ बद्री,भरत नेहते,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,माजी उपनगराध्यक्ष नंदाताई लोखंडे,यांच्यासह शहरातील सुज्ञ नागरिक व पालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.






