फैजपूर

सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत आदिवासी तरुण शेतकरी बांधवांकरिता बांबू प्रक्रिया व बांबू उद्योग प्रशिक्षण…

सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत आदिवासी तरुण शेतकरी बांधवांकरिता  बांबू प्रक्रिया व बांबू उद्योग प्रशिक्षण…

सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत आदिवासी तरुण शेतकरी बांधवांकरिता बांबू प्रक्रिया व बांबू उद्योग प्रशिक्षण...

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी

सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत आदिवासी तरुण शेतकरी बांधवांकरिता  बांबू प्रक्रिया व बांबू उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम दि २२-२५ सप्टेंबर २०१९ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आधिक उत्पन्न व रोजगार उपलब्ध व्हावा हा मुख्य दृष्टिकोन ठेवून बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.तरुण आदिवासी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून प्रक्रिया उद्योग करावा असे मत प्रशिक्षण उदघाटन प्रसंगी मा.अजित पाटील (सचिव,सा वि म)यांनी व्यक्त केले तसेच ईच्छा शक्ती व तंत्रज्ञान आत्मसात करून मोठे कृषी उद्योजक व्हावे असे मत मा.महेश जोशी (प्राचार्य, चेतना कॉलेज,मुंबई) यांनी मांडले.या प्रशिक्षण वर्गाला मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री.मुनिर वाहवटी(विषय तज्ज्ञ,बांबू,मेलबर्न युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया) प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.व्यासपीठावर श्री.अशोक झांबरे (संचालक, सा वि म),श्री.संजय महाजन(प्रमुख, के व्ही के,पाल) आणि  श्री.चंद्रकांत बोरोले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश महाजन(शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण,के व्ही के,पाल)यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button