Jalgaon

?दंगल राजकारणाची..जळगावात वर्चस्व खडसेंचे….! खडसे – महाजन यांच्यात शीतयुद्ध !

?दंगल राजकारणाची..जळगावात वर्चस्व खडसेंचे….! खडसे – महाजन यांच्यात शीतयुद्ध !

जिल्ह्यात खडसे व महाजन यांच्यात भाजपत असताना वर्चस्वासाठी शीतयुद्ध सुरू होते. आता तर दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असल्याने कोणाचे वर्चस्व आहे हे दाखविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या वर्चस्व वादात खडसे समर्थक थेट खडसे यांच्या समर्थनात भाजपात असूनही उतरत आहेत. तर दुसरीकडे महाजन यांना जाहिरातीच्या माध्यमातून दाखवावे लागत आहे की ते आपल्या सोबत आहेत. त्यामुळं महाजन यांचा प्रयत्न जळगाव पुरता होताना दिसत आहे. तर खडसे यांचे समर्थक जिल्हाभर होताना दिसत आहे. आज भुसावळ नगर पालिकेचे भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने केलेल्या जाहिरातीत खडसे यांना स्थान मिळाले.

यात महाजन यांना पुन्हा डावलण्यात आल्याचे यावरून दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये खडसे व महाजन यांच्यात वर्चस्व कोणाचे? अशी जरी लढाई दिसत असली तरी या लढाईमध्ये एकनाथराव खडसे यांचा जिल्ह्यात संपर्क व कार्यकर्त्यांचा एक वेगळा गट आहे हे दिसून येते. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांनी खडसे यांना वेळोवेळी आपले समर्थन आहे हे दाखवून दिले आहे. यामुळे भाजपमधील नेते भाजपात आहे हे दाखवण्यासाठी यांनी नुकतीच एक जाहिरात केली. त्या जाहिरातीमध्ये आमदार महापौर-उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे फोटो टाकण्यात आले. त्यात सशक्त भाजप सशक्त भारत असे वाक्य होते. यावरून जिल्ह्यातील भाजप नेते हे भाजपात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला.

भुसावळ आमदारांच्या वाढदिवसाला करण्यात आलेल्या जाहिरातीमधून ते खडसे समर्थक असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्व आमदार, खासदार यांचे फोटो टाकून त्याला सशक्त भाजप म्हणून महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर भुसावळ नगरपालिकेवर एक हाती भाजपाची सत्ता आहे. याठिकाणी भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विराजमान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून पुन्हा ते खडसे समर्थक असल्याचे दाखवून देण्यात आले. या जाहिरातीमध्ये खडसेंसह खासदार रक्षा खडसे व भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार यांचे सुद्धा फोटो आहेत. मात्र इतर भाजपच्या कोणत्याही नेत्याला या जाहिरातींमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button