Amalner

अमळनेर: सुनील वाघ महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर: सुनील वाघ महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यंदाचा २०२१ चा सन्मानाचा महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार या वर्षी १० शिक्षकांना देण्यात आला.यात राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त जी एस हायस्कुल चे क्रीडा शिक्षक व अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष सुनिल प्रभाकर वाघसर यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सन्मानप्रमाणपत्र , पदक , सन्मानचिन्ह ,मानपत्र व बुके देऊन सन्मान पुरस्कार २८ नोव्हेंबर रविवारी जळगाव येथील अल्पबचत भवन याठिकाणी देऊन सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जि.प.प्राथमिक प्र.उपशिक्षणाधिकारी व मुक्ताईनगर गटशिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार सर होते तर अंकुर साहित्य परिषद सहसचिव हकीम आर चौधरी मुक्ताईनगर,लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद,सरकारी वकील श्री कलंतरी, अब्दुल मजीद जकरीया जळगाव, अब्दुल करीम सालार जळगाव,संभाजी ब्रिगेड चे दिनेश भाऊ कदम मुक्ताईनगर,मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख,अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष जहांगीर खान,हाजी फजल सेठ अडावद,रि. मुख्या. फारूक पटेल अडावद,मुख्याध्यापक शब्बीर अहमद अडावद, पीआर माळी अडावद,इम्रान खान अडावद,जहांगीर पठाण ,जळगाव जैन अकॕडमीचे फारुख सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी केले तर जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले. वाघ सर यांनी क्रीडा क्षेत्रांत खेळाडू राष्ट्रीय , राज्यस्तरापर्यत पोहचवले असुन सर्व खेळाडूचा सराव ते रोज करुन घेतात.त्याना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले असुन खेळाडू साठी व भरतीसाठी सुध्दा विद्यार्थ्यांकडुन मेहनत ते करुन घेतात.पुरस्कार मिळाल्याबद्दला सराचे खा.शि.मचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र जैन ,शालेय समिती चेअरमन श्री योगेश मुंदडे ,संचालक श्री.नीरज अग्रवाल , संचालक डाॕ.बी एस पाटील , संचालक डाॕ.संदेश गुजराथी , संचालक व समन्वय समिती चेअरमन श्री हरी भिका वाणी , संचालक श्री.कल्याणबापु पाटील ,संचालक श्री प्रदीप अग्रवाल ,सचिव प्रा.ए बी जैन ,अध्यक्ष श्री.अनिल कदम , उपाध्यक्ष श्रीमतीमाधुरी पाटील ,उपाध्यक्षश्री.कमल कोचर , विश्वस्त सौ.वसुंधरा लाडगे मॕडम ,मुख्याध्यापक श्री.डिगबर महाले , उपमुख्याध्यापक श्री.ए एस करस्कर ,शिक्षक प्रतिनीधी विनोद कदम , श्री.व्ही व्ही कुलकर्णी , क्रीडा समिती कार्याध्यक्ष संजय पाटील ,श्री.डी डी राजपुत ,श्री.निलेश विसपुते , श्री के यु बागुल व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button