Erandol

प्रांताधिकारी यांच्या आश्वासन व कार्यवाही केल्याने एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष यांचे आंदोलन मागे.

प्रांताधिकारी यांच्या आश्वासन व कार्यवाही केल्याने एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष यांचे आंदोलन मागे.

एरंडोल येथे प्रांताधिकारी विनय गोसावी यांना आंदोलन मागे घेण्याचे निवेदन देताना सुधाकर वाघ व कार्यकर्ते.

प्रांताधिकारी यांच्या आश्वासन व कार्यवाही केल्याने एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष यांचे आंदोलन मागे.

रजनीकांत पाटील

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील येथे अवैध गौण खनिज करवाई साठी दि.८ सप्टेबर पासुन आंदोलन करणार असल्याचे निवेदन सुधाकर वाघ जिल्हाध्यक्ष एकलव्य संघटना यांनी प्रांताधिकारी विनय गोसावी यांना दिले होते. परंतु यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी उत्राण येथे ५०० ब्रास,हनुमंत खेडे येथे ७ ब्रास, तळई येथे ५० ब्रास अवैध गौण खनिज जप्तीची कार्यवाही स्वतः केली होती आणि मागील एक आठवड्यापासून उत्राण,हनुमंत खेडे येथे पथक लावले असुन तलाठी, मंडळ अधिकारी,तहसिलदार यांना नोटीसा दिल्या आहेत.८ ते १० दिवसात तहसील कडून कार्यवाही न झाल्यास शि स्तभंगाची कार्यवाही करणार असल्याचे लेखी दिले आहे आणि स्वतः प्रांताधिकारी यांनी दौरा करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचे समाधान झाले व त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button