Amalner

वेब मिडिया असोसिएशनची कार्यकारणी जाहीर संभाजी देवरे खान्देश विभागिय संघटक तर ईश्वर महाजन यांची अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड

वेब मिडिया असोसिएशनची कार्यकारणी जाहीर

संभाजी देवरे खान्देश विभागिय संघटक तर
ईश्वर महाजन यांची अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड

अमळनेर प्रतिनिधी- वेब मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सचीव गणेश पुजारी यांनी नुकतीच जाहीर केली.
वेब मीडिया असोसिएशनची मुंबई येथे बैठक घेतली व कार्यकारिणी घोषित केली.
वेब मीडिया असोसिएशन ही रजिस्टर असोसिएशन असून वेब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांचे संघटन करणार असून त्यांच्या अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील पोर्टलला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर ते प्रयत्न करणार आहेत. यासाठी त्यांनी अगोदर वेब असोसिएशनची झूम मीटिंग द्वारे पत्रकारांशी संपर्क साधला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक मोठे संघटन उभे राहणार आहे.
अमळनेर येथील ( महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई- सदस्य) लोक न्यूज पोर्टलचेे संपादक संभाजी देवरे यांची खानदेश विभागीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यकार्यकारणी सदस्य व
मराठी लाईव्ह न्युजचे संपादक ईश्वर महाजन यांची वेब पोर्टल असोसिएशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील, देवगांव देवळी हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button