Amalner

Amalner: आई वडील बाहेर..! अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले..

Amalner: आई वडील बाहेर..! अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले..

अमळनेर:तालुक्यातील गावात आई-वडील घरी नसताना मध्यरात्रीच्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक ३१ मे रोजी सकाळी अल्पवयीन मुलीचे आई- वडील दोघेही मध्य प्रदेशातील एका गावात लग्नसमारंभासाठी गेले असता मुलगी व मुलगा घरीच होता. दिनांक ३१ मे रोजीच्या रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने १४ वर्षे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मध्य प्रदेशात लग्नास गेले असताना
त्यांच्या मालकाचा फोन आला त्यांनी सांगितले की तुझी मुलगी घरी दिसत नाही आहे त्यांनी लागलेच अमळनेरकडे धाव घेत असता अल्पवयीन मुलीची शेत शिवारात शोधाशोध केली असता त्यांना ती मुलगी आढळून न आल्याने त्यांनी अंमळनेर पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार नोंद केली आहे या प्रकरणी पुढील तपास पो कॉ प्रमोद पाटील करीत आहे.

संबंधित लेख

One Comment

  1. बातमीमध्ये अमळनेर तालुक्यातील गावात असे म्हटले आहे कोणते गाव दिलेले नाही

Leave a Reply

Back to top button