Faijpur

युनियन समृद्धी केंद्र हे ग्राहकांसाठी सुविधाजनक – मा मानस रंजन बिस्वाल

युनियन समृद्धी केंद्र हे ग्राहकांसाठी सुविधाजनक – मा मानस रंजन बिस्वाल

सलीम पिंजारी

युनियन बँक ऑफ इंडिया ला शंभर वर्षाची वैभवशाली परंपरा असून देशाच्या विकासात युनियन बँकेचा मोलाचा वाटा आहे.शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील शेतकरी, उद्योजक व तरुण यांना गरजेनुसार आर्थिक पाठबळ देण्याचे काम बँक अतिशय तत्परतेने करते. आर्थिक सुधारणांमध्ये दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने युनियन समृद्धी केंद्र अत्यंत शीघ्र गतीने कर्जाची प्रकरणे निकाली काढण्याचे काम करील व भविष्यात अशा केंद्रांना कृषक सहाय्यता केंद्र बनवून शेती क्षेत्रात भरभराट करण्याचे लक्ष आहे, असे मत मा मानस रंजन बिस्वाल, कार्यपालक निदेशक, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी केले.

युनियन समृद्धी केंद्र हे ग्राहकांसाठी सुविधाजनक - मा मानस रंजन बिस्वाल

ते फैजपूर येथे युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत नूतन वास्तूचे उद्घाटन व जिल्ह्यातील अकरा तालुक्यांना जोडणारे युनियन समृद्धी केंद्र फैजपूर यांच्या भव्य उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी श्री दीपक कांबळे, महाप्रबंधक, डॉ अजित मराठे उपमहाप्रबंधक, डॉ अजित थोरबोले, प्रांताधिकारी फैजपूर, मा किशोर चव्हाण, मुख्याधिकारी नगरपालिका फैजपूर, श्री राजेश किनगे केंद्रप्रमुख ,श्री जयराम टोकरे शाखा व्यवस्थापक, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अकरा तालुक्यातील ग्राहकांना लोन मान्यता लेटर व वेहिकल कीज यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात धनाजी नाना महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी ‘हीच आमची प्रार्थना’ या गीताने केली. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते समृद्धी केंद्राचे उद्घाटन फीत करण्यात आले. यावेळी अफजल खान शब्बीर खान फैजपूर, जयदीप महाजन केर्‍हाळे, प्राध आय जी गायकवाड फैजपूर, अनिल पाटील रावेर, निखिल महाजन सांगवी, क्षितिज चौधरी केर्‍हाळे, रंगनाथ शेळके जामनेर, गोविंदा कोळी शेंदुर्णी, विलास चौरे जामनेर, इक्बाल पटेल रिंगणगाव, दीपक नारखेडे नशिराबाद, नारायण चौधरी तांदलवाडी, यांना संक्शन लेटर देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्षेत्रीय कार्यालय नाशिक येथील गृह पत्रिका युनियन पंचवटीच्या द्वितीय अंकाचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमात रूरल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मा लखन पगडे यांनी पंधरा दिवसात एक कोटी 88 लाखाचे 41 प्रपोजल निकाली काढल्याबद्दल व भूषण मोरे यांनी पंधरा दिवसात एक कोटी 78 लाख रुपयांचे 40 प्रकरणे मान्य करून दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मा किशोर चव्हाण मुख्याधिकारी, यांनी बँका हाच विकासाचा आधार असून प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार बँकेतून वित्तपुरवठा स्वीकारून स्वतःचा व्यवसाय भरभराटीला न्यावा असे आवाहन केले. डॉ अजित थोरबोले यांनी बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या डिजिटलायझेशन सेवेबद्दल समाधान व्यक्त करीत युनियन सुविधा केंद्राच्या माध्यमातून बँकेचे हेलपाटे कमी होऊन शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील असा आशावाद व्यक्त केला व उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे बाबत सजग राहण्याचे व बचत करण्याचे आवाहन केले.

श्री दीपक कांबळे यांनी देशातील 57 व्या युनियन समृद्धी केंद्राचे उद्घाटन फैजपूर येथे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या यशस्वी मॉडेलच्या माध्यमातून पंचक्रोशीत भरभराट होईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार मा राजेश किनगे, केंद्रप्रमुख युनियन समृद्धी केंद्र फैजपूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनियन बँक ऑफ इंडिया चे सर्व अधिकारी तथा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button