India

? ठोस प्रहार ब्रेकिंग…लॉक डाऊन: महाराष्ट्रात सेक्स टॉय ला वाढती मागणी…मुंबई,पुणे आघाडीवर

? ठोस प्रहार ब्रेकिंग…लॉक डाऊन:महाराष्ट्रात सेक्स टॉय ला वाढती मागणी… मुंबई,पुणे आघाडीवर

प्रा जयश्री दाभाडे

गेल्या चार महिन्यांपासून संपुर्ण जगातच नव्हे तर देशात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे.आता हळूहळू अन लॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे.आणि संथ गतीने का होईना पण देशातील व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू होत आहेत.ज्या प्रमाणे लॉक डाऊन चे परिणाम समाज,आर्थिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,अध्यात्मिक घटकांवर झाले तसेच अन लॉक चे ही परिणाम होत आहेत. संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देशातील सेक्स टॉयच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.आणि यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असून…महाराष्ट्रात पुणे ,मुंबई या मेट्रो पोलिटियन शहरांसह इतर छोटे शहरे देखील आघाडीवर आहेत.

आज ही भारतीय समाजात सेक्स या विषयावर बोलणे किंवा चर्चा करणे योग्य मानले जात नाही.भारतीय संस्कृती आणि समाजात सेक्स देखील गुपचूप चोरून लपून किंवा अंधारात केला पाहिजे,ही अत्यन्त खाजगी गोष्ट आहे आणि याची चर्चा करणे म्हणजे एक प्रकारचे पाप किंवा वाईट कृत्य आहे असा गैरसमज आहे. वास्तविक सेक्स हा अत्यन्त नैसर्गिक गोष्ट असून ह्या विषयावर बोलणे भारतात असभ्य मानले जाते.

परंतु आता सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना राबविल्या जात आहेत. आता अन लॉक ची प्रक्रिया सुरू आहे आणि लॉकडाउननंतर सेक्स टॉय (Sex toys) च्या विक्रीत मोठी वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्या काही महिन्यात देशभरात सेक्स टॉयच्या विक्रीत तब्बल 70% इतकी वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

‘इंडिया अनकवर्ड: इन साइटफुल एनालिसिस ऑफ सेक्स प्रोडक्ट्स ट्रेंड्स इन इंडिया’ या ThatsPersonal.comच्या अहवालात भारतीय बाजारपेठेत सेक्स खेळणी विक्रीची माहिती देण्यात आली आहे. या खेळण्यांची विक्री आणि ग्राहकांचा कल याबद्दल या अहवालात नमूद केले आहे.

सेक्स टॉयची विक्रीची सर्वात जास्त खरेदी महाराष्ट्रात झाली आहे. सेक्स टॉयची सर्वाधिक विक्रीतबाबत प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र सर्व दुसऱ्या स्थानावर कर्नाटक तर तिसऱ्या स्थानावर तामिळनाडूचा क्रमांक आहे.देशातील पहिल्या १० शहरांमध्ये पुणे आठव्या क्रमांकावर आहे.

मेट्रो शहरांचा विचार केल्यास मुंबईत सर्वाधिक सेक्स टॉयची विक्री झाली आहे. देशात मुंबई अव्वल स्थानी आहे. तर बेंगळुरू दुसऱ्या आणि नवी दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे. एनसीआर (राजधानी दिल्ली परिसर) च्या तुलनेत मुंबई महानगर (MMR)मध्ये सेक्स टॉयची विक्री जळजवळ २४% एव्हढि आहे.तर यासाठी चा सर्वाधिक खर्च सुरत शहरातून केला जातो. या शहरातील प्रति ऑर्डरमागे 4000/- खर्च केले जातात.

महिलाही आहेत आघाडीवर

विजयवाडा, जमशेदपूर, बेळगाव, वडोदराया शहरांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला खरेदीदारांची संख्या अधिक आहे. सेक्स टॉय खरेदी करणाऱ्या अधिकतर ग्राहकांचे वय २५ ते ३४ च्या दरम्यान आहे. पण या टॉयची खरेदी करणाऱ्या वेबसाइटवर अधिक तर वेळ भेट देणाऱ्यांचे वय १८ ते २५ वर्ष आहे. अनेक ग्राहक निरोध खरेदी करण्यासाठी वेबसाइटवर येतात आणि अखेर सेक्स टॉय खरेदी करतात, असे देखील दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सेक्स टॉयमुळे ३३ टक्के विवाह मोडले नाहीत.सुरुवातीला सेक्स टॉय खरेदी करणारे पुरुष असतात पण पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक वेळा पुन्हा पुन्हा ऑर्डर करतात असे अहवालात नमूद केले आहे. उत्तर प्रदेशात पुरुष अधिक जास्त प्रमाणात सेक्स टॉय खरेदी करत आहेत.कोरोना लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर स्त्री पुरुष सेक्स टॉय च्या खरेदी विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून बाजारपेठ वेगाने वाढत आहे. या संदर्भात ग्राहक नवे नवे प्रयोग करत आहेत.

एकूणच काय तर लॉक डाऊन.. किंवा अन लॉक ची प्रक्रिया सुरू असतांना अनेक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत.पण इतर घटकांच्या परिणामांचा उहापोह केला जातो पण जी गोष्ट मानवी जीवनात अत्यन्त आवश्यक आणि नैसर्गिक आहे त्या गोष्टींवर काय परिणाम होतात याकडे दुर्लक्ष केले जाते. उद्या पुन्हा याच विषया संदर्भात वेगळा दृष्टिकोन घेऊन आपणा समोर उपस्थित होईल..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button