Nashik

दिंडोरी येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ खा. डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत विजबिल होळी आंदोलन

दिंडोरी येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ खा. डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत विजबिल होळी आंदोलन

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी असतांना देखील सरासरी विजबिलाच्या नावाखाली वीजवितरण कंपनीने जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवले. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना बसला असून अनेकांना वाढीव बिले आल्याने हे आवाच्या सव्वा बिले भरायची कशी अशा विवंचनेत ग्राहकवर्ग सापडला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट पर्यंत मोफत वीज देऊ अशी घोषणा केली होती व वाढीव विजबिले कमी करण्याचे आश्वासन दिले असतांना त्यावर कुठलीही कार्यवाही न करता सामान्य जनतेला भरमसाठ वीजबिले पाठवून ते भरण्याची सक्ती केली जात आहे. ही वीज उपभोक्ता ग्राहकांची व शेतकऱ्यांची घोर फसवणूक असून ह्याचा जाहीर निषेध दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी येथील विजवीतरण कार्यालयासमोर वाढीव आलेल्या विजबिलांची होळी करून निषेध करण्यात आला. वाढीव विजबिले कमी करावी म्हणून विज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैंद, युवामोर्चा प्रदेश सदस्य अंकीतजी संचेती, भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत राजे, प्रमोद देशमुख ,विलास देशमुख, शिवाजीबाबा पिंगळ, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, बाबूशेठ मणियार, श्याम बोडके, तुषार वाघमारे, योगेश बर्डे, योगेश तिडके, अनिल गाडे, संपत पिंगळ, वाहिद मणियार, रणजित देशमुख, अमर राजे, गणेश चव्हाण, बाळासाहेब सोनवणे, दत्तात्रय जाधव, कैलास धात्रक, राम कराटे, बापू बोंबले, निलेश गायकवाड, कैलास गाढवे, राजू शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व वीज उपभोक्ता ग्राहक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button