Amalner:चोऱ्यांचे सत्र थांबेना..! शिरुड येथे एकाच रात्री मंदिर,घरफोडी आणि गुरे चोरी…!
अमळनेर तालुक्यातील शिरुड गावात चोरट्यांनी एकाच रात्री घरफोडी मंदिराची दानपेटी आणि गुरे चोरून नेल्याची जबरदस्त चोरीची घटना घडली असून परिसरात खळबळ माजली असून भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरुड येथील शेतकरी कैलास फकिरा धनगर हे 29 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता भजन ऐकायला गेले होते. रात्री साडे बारा वाजता परत आल्यावर झोपून गेले. पहाटे तीन वाजता 3 वाजता पत्नी च्या लक्षात आले की दागिन्यांच्या पेटित ठेवलेले दागिने दिसत नाहीत. त्यांनी शोध घेतला असता दागिने मिळून आले नाही.तर काही महिलांनी सांगितले की नाना भिला पाटील यांच्या शेतात दागिन्यांच्या खाली पेट्या पडलेल्या आहेत.दागिन्यांच्या खाली पेट्या पडलेल्या आहेत. चोरी झालेल्या मालात कापूस विक्रीचे आलेले एक लाख चाळीस हजार रुपये, 30 हजार रुपयांचे 10 ग्राम सोन्याची पोत , 15 हजार रु ची 5 ग्राम सोन्याची अंगठी, 3 हजार रु ची ग्राम अंगठी , 27 हजार रु ची 35 भार चांदी असा एकूण 2 लाख 15 हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या घटनेत रविंद्र पाटील यांची खळ्यात बांधलेली गाय व रेडा चोरून नेल्याची घटना घडली आहे. एकूण किंमत 50 हजार रु असल्याचे फिर्यादी ने सांगितले आहे.
तसेच गावातीलच दत्त मंदिरातील कडी कोयंडा तोडून दानपेटी वर डल्ला चोरट्यांनी मारला आहे.80 हजार रु ची चोरी झाल्याची फिर्याद कैलास धनगर यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






