Maharashtra

खड्डे युक्त मुंबई-आगरा राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची मागणी…

खड्डे युक्त मुंबई-आगरा राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची मागणी…

प्रतिनिधी, शिरपूर मनोज पावरा
देशाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांपैकी प्रमुख एक असलेला मुंबई – आगरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 खड्डे युक्त असल्याची वास्तवता शिरपूर तालुक्यात आहे. मागील 4-5 महिन्यांपासून हे खड्डे ‘जैसे थे च’ आहे. याकडे मात्र एनएचएआई चे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई – आगरा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश चाळण झालेली आहे. ये – जा करणाऱ्या वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असून यामुळे मृत्यु चे प्रमाणही वाढले आहे. रात्रंदिवस महामार्गांवरून हजारों वाहनांच्या फेऱ्या होतात. लाखोंचा टोल वसूल केला जातो. मात्र महामार्गच खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? अशी अवस्था राष्ट्रीय महामार्गाची झालेली आहे. याकडे संबंधित विभागाने तात्काळ वर्ष देवून महामार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button