Amalner

Amalner: शिवजंतीनिमित्त अमळनेर पोलिसांचा चोख बंदोबस्त…

Amalner: शिवजंतीनिमित्त अमळनेर पोलिसांचा चोख बंदोबस्त…

अमळनेर पो.स्टे. हद्दीत आज दि.१९ फेब्रुवारी दिनानिमित्त श्री. छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अमळनेर पो. स्टे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे ४ दुय्यम अधिकारी व ६० अमलदार, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव चे १० अमलदार, सायबर पोलीस स्टेशन चे १० अमलदार, RCP चे १५ अमलदार, ४० होमगार्ड अशांचा योग्य ते नियोजन करून शहरात ओपन जीप गस्त सोबत दंगा नियंत्रण पथक open शस्त्र सह, तसेच तहसीलदार श्री. मिलिंद वाघ, कार्यकारी दंडाधिकारी श्री. बावणे यांच्या सोबत घेऊन समिश्र वस्तीत प्रभावी गस्त केली. तसेच सर्व संवेदन भागात देखील गस्त पायी गस्तसाठी विशेष पथक नेमले असून मोटर सायकल गस्त सुरू ठेवल्या आहेत. ग्रामीण भागात देखील पाच मोटर सायकल गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर देखील लक्ष देऊन ज्यांनी आक्षेप असणारे स्टेटस, व्हिडिओ लावले होते अशाना समक्ष बोलून सक्त ताकीद दिली. तरी सोशल मीडियावर देखील लक्ष देऊन आहेत. एकंदरीत अत्यंत नियोजनपूर्वक व नियंत्रणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button