?Big Breaking… उद्योगपती महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉक डाऊन संदर्भात यांना काय दिला सल्ला..!
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. लॉकडाऊन होणार की नाही ? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम अधिक वाढत आहे. तर गेल्या लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अद्यापही सामान्य वर्गाला नीट करता आलेली नाही. अशातच पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने काहीशी भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, मागील लॉकडाऊन हे आरोग्य विभागाच्या व्यवस्था सक्षमपणे उभ्या करण्यासाठी लागू करण्यात आलं होतं. आता मृताचं प्रमाण कमी करून या आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात याव्यात, असं देखील ते म्हणाले आहेत.
उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात,’ असा सल्ला देखील महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.






