आमदार डाँ. संदिप धुर्वे यांना MPSC मधील बोगस आदिवासी नियुक्ती देऊ नये याबदल विविध संघटनेची निवेदन द्वारे मागणी
पुणे प्रतिनिधी – दिलीप आंबवणे
आर्णी- केळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सन्माननीय डॉ.संदिपभाऊ धुर्वे यांना आज बिरसा क्रांती दलाचे महासचिव मा.प्रमोदजी घोडाम यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले . आमदार महोदयांशी तब्बल सव्वा तास सविस्तर चर्चा झाली.
अवैध जातप्रमाणपत्र धारकांना अधिसंख्य पदावर दिलेली नियुक्ती रद्द करून देण्यात आलेले लाभ वसूल करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
एमपीएससी परीक्षेतील बारा संशयित उमेदवारांची जातवैधता पडताळणी शिवाय नियुक्ती आदेश देण्यात येवू नये.
अशी दोन निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.प्रा.कैलास बोके, महासचिव मा.प्रफुल्ल कोवे , आँल इंडिया आदिवासी एम्प्लाँईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष मा.गुलाबभाऊ कुडमथे, सचिव पवनकुमार आत्राम उपस्थित होते.






