Maharashtra

डिजिटल ऑनलाइन शिक्षणाचा ऑफलाइन विचार प्रवाह.

डिजिटल ऑनलाइन शिक्षणाचा ऑफलाइन विचार प्रवाह.

अतिथी संपादक डॉ विलास काळे

चार महिने झाले कोविड- १९ च्या जागतिक महामारी मुळे शाळा बंद आहेत. शिक्षकांची विद्यार्थ्यांशी भेट नाही. अखंड पणे विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू रहावे, विद्यार्थी – शिक्षक -शिक्षणाचा समन्वय रहावा म्हणून Work To Home अंतर्गत डिजिटल ऑनलाइन शिक्षण Learn To Home चालू आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या आई – वडिल पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल असणारे चे वॉटसॲप ग्रुप द्वारे शिक्षण चालू केले आहे. दूरदर्शन टीव्ही चॅनल, एस.एम.एस.,कुटुंबातील सदस्य, यांच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
याबाबत मला असे जाणवले की काही जण फक्त कुठल्यातरी ग्रुपवर आलेल्या पोस्ट किंवा लिंक आहे तशाच आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करत आहेत. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा अनेक पोस्ट बाहेर पडत आहेत. खरंच या शैक्षणिक पोस्ट उपयुक्त आहेत की नाही ???? हे ही न पाहता आहे तशी फॉरवर्ड करत आहेत. काही जण मात्र वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून कृती आधारित अभ्यास शेअर करतात. ही एक अभिनंदनीय व अभिमानाची गोष्ट आहे. शैक्षणिक व्हिडीओ व लिंक उत्कृष्टरित्या कौशल्याने बनवलेल्या आहेत. त्या फक्त नियोजनानुसार उपयोगीते नुसार त्यांचा वापर त्यांचा उपयोग केल्यास या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण निश्चितच होईल. दिशादर्शक होईल यासाठी फक्त गरज आहे शैक्षणिक व्हिडिओंचा उपयोग विषयानुसार घटक -उपघटकानुसार करणे. या साठी गरज आहे नियोजनाची आपल्या वर्गाचा समुह आपण बनवलेला आहे. या समुहाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, क्षमता विकसित करणार आहेत.

आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर आपणास माहीत आहे. अध्ययन स्तर निश्चिती आपण केलेली आहे. विद्यार्थ्यांची शिकण्याची गती माहिती आहे. जर प्रत्यक्ष शाळा चालू असती तर आपण मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास, भूगोल, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, मुल्यशिक्षण या विषयांचे प्रत्यक्ष अध्यापन, मार्गदर्शन कसे केले असते ???? वार्षिक आराखड्यानुसार , नियोजनानुसार. आता ही आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुलभकाच्य भुमिकेतून करावयास हवे.
विद्यार्थ्यांची शिकण्याची गती, त्यांच्या क्षमता, कौशल्य, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती नुसार, स्वत: निर्मिती करून अभ्यास पाठवावा. कारण आपल्या वर्गांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती फक्त आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मुलांना कृती आधारित अभ्यास देणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे नियोजन आपण करू शकतो.

डिजिटल ऑनलाइन शिक्षण कसे असावे–एक विचार

सध्याच्या लॉकडाउन काळात शाळा बंद पण घरीच राहून शिक्षण चालू असतानाच्या काळातही आपला विद्यार्थी कशा रीतीने चांगला अभ्यास करू शकेल, शिक्षण चालू राहील, विद्यार्थी शिकण्यास प्रेरणा मिळेल यासाठी काही उपाययोजना स्वत:,शाळांना, शिक्षकांना करता येतील. यासाठी दीक्षा ॲप, शाळा बंद पण शिक्षण चालू पोस्ट, विविध अध्ययन अध्यापनाच्या शैक्षणिक वेबलींक,वेब लिंक वरील शैक्षणिक साहित्य, विविध शैक्षणिक व्हिडिओ, एस. सी.ई.आर.टी.ची शैक्षणिक दिनदर्शिका, युट्युब वरील शैक्षणिक व्हिडीओ, पुस्तके, पूरक पुस्तके, विविध पीडीएफ, वर्तमानपत्र, विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारे परिसरातील व कुटुंबातील साहित्य त्यांचा कौशल्याने उपयोग करता येईल. व्हॉटसॲपच्या समूहाच्या माध्यमातून समूहामध्ये विषयवार घटक – उपघटकानुसार विद्यार्थी – विद्यार्थी संवाद प्रक्रिया, चर्चा, माहितीची व ज्ञानाची देवाण-घेवाण करता येईल. विद्यार्थी एकमेकांच्या साह्याने शिकू शकतील. समूहांमध्ये अशाप्रकारच्या शैक्षणिक चर्चा,चॅटिंग,व्हिडीओ कॉलिंग, एसएमएस’ द्वारे करू शकता येईल. याही माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण होण्यास मदत निश्चित होणार आहे. या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी, बंधुभावाची भावना, सहकार्य, अभ्यासाची वृत्ती, जिज्ञासा जागृती, सर्जनशीलतेचा विकास, मूल्यशिक्षण, संस्कार, जीवन जीवनकौशल्यांचा विकास, माहिती तंत्रज्ञान साधनांचा उपयोग योग्य कामासाठी उपयोग, माहिती-तंत्रज्ञान साधनांची जाणीव जागृती होईल, माहिती तंत्रज्ञान साधनांद्वारे माहिती, ज्ञान, कौशल्य मिळू शकते हे समजण्यास मदत होईल.

आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची आपल्याकडे यादी हवी. सर्वांचे फोन नंबर मिळविण्याचा प्रयत्न करावा.
ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नाही त्यांना फोन करून अभ्यासाची चौकशी करावी.
स्वतः टाइप करून वाचन, लेखन, गणितीयक्रिया, प्रश्नोत्तरे, चित्रवाचन, स्वाध्याय, उपक्रम, कृती, विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळेल, विद्यार्थी यार होतील, शिकण्याची ओढ निर्माण होईल, पालकांनाही अभ्यास समजण्यास मदत होईल अशा प्रकारचा अभ्यास, वस्तुनिष्ठपणे विषय घटक- उपघटकानुसार अभ्यास शेअर केल्यास शैक्षणिक वातावरण तयार होऊन विद्यार्थी शिकण्यास मदत होईल.ज्या पाठा संदर्भात घटक- उपघटका संदर्भात आपण अभ्यास देणार आहोत याचे यूटय़ूबवरील लिंक पाठवावी. लिंक फार तर एक किंवा दोन असाव्यात. युट्युब, शैक्षणिक दिनदर्शिका, वेबलिंक किंवा शैक्षणिक ॲप्स मधील व्हिडिओ मधून आपण काय पहावे ? काय शिकणार आहोत ? याची स्पष्ट नोंद आपल्या पोस्ट मध्ये असावी. आठवड्यातील वारानुसार, वेळेनुसार विषयांचे नियोजन केले तर सर्व विषयांना योग्य न्याय मिळेल. ज्या त्या वाराला, त्यावेळेला, त्याच विषयाची पोस्ट शेअर करावी. त्याच विषयाचा अभ्यास वस्तुनिष्ठपणे शेअर करावा. यामध्ये आपापल्या इयत्तांच्या विषयानुसार व काठीण्य पातळीनुसार बदल करू शकतो.

रोज विद्यार्थ्यांना एका विषयाचा एक पाठ पूर्ण वाचून त्याचा स्वाध्याय सोडवणे, त्या पाठावर आधारित स्वतः प्रश्न तयार करणे, त्या पाठावर आधारित असणार उपक्रमांची यादी करून विद्यार्थ्यांना पाठविणे अशा रीतीने अभ्यास दिला तर तो खूप वस्तुनिष्ठरीत्या दिला असे होईल.
एखाद्या विषयाची घटक- उपघटकाची अवघड संकल्पना असेल तर ती संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी स्वतःचा ५ ते १० मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवावा. दररोज किमान एका विषयातील एका घटक- उपघटकानुसार व्हिडिओ तयार करून शेअर करावा.विद्यार्थी आपले शिक्षक व शिक्षिकांचे प्रत्यक्ष व्हिडीओ पाहून त्यांना आनंद होईल.आपल्या शिक्षकांविषयी आपुलकी निर्माण होऊन अभ्यास करणेस चालना, प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल. एखाद्या पाठावर स्वतः प्रश्न,उपक्रम, कृती तयार करून पाठवावेत व त्याची उत्तरे लिहायला सांगावीत.
सध्याचे शिक्षण हे अॅक्टिव्हिटी बेसड् लर्निंग (अध्ययन निष्पत्ती वर आधारित )असल्यामुळे जास्तीत जास्त अॅक्टिव्हिटीजचा समावेश करता येईल. गुगल प्ले स्टोअर मधून वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन मिटींगचे ॲप्स आहेत. उदाहरणार्थ झुम मीटिंग, गुगल मीटिंग, टीम, गूगल क्लासरूम च्या मदतीने ऑनलाईन तीस ते चाळीस मिनिटांचे आपण अध्ययन-अध्यापन, मार्गदर्शन, मिटींगसुद्धा घेऊ शकतो. ऑनलाईन मिटींगचे ॲप्स वापरताना पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीला बाधा निर्माण होणार नाही याची पूर्ण सिक्युरिटी घेऊन काळजी घेऊन आपणास ऑनलाईन अध्यापन व मार्गदर्शन करता येईल. आपल्या वर्गांतील विद्यार्थी मुलभूत क्षमतांमध्ये मागे असल्यास अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मेसेज देउन त्या स्तराचा पुरक अभ्यास, कृती देता येतील.

श्रवण, भाषण व संभाषण, वाचन – अनुवाचन -मुकवाचन, लेखन अनुलेखन -श्रुतलेखन, निरीक्षण, चित्र वर्णन, स्वतःचे लेखन, निबंध लेखन, गणितीय क्रिया, आकृती, विविध कृती व उपक्रम, प्रश्नोत्तरे, विचारास चालना देणारे प्रश्र्न, माहिती लिहिणे, कैशल्य विकास निर्मिती, सृजनशीलतेवरील प्रश्र्न व कृती यावर जास्तीत जास्त भर असावा. यावर आधारित कृती आधारित पोस्ट शेअर केल्यास निश्चितच विद्यार्थी शिकण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट, घटक -उपघटक किती समजले, ज्ञान, आकलन, उपयोजन कौशल्य, अभिरूची, मत व्यक्त करणे, मांडणी करणे, स्वतः लिहिणे, उदाहरण सोडविणे, प्रश्नोत्तरे लिहिणे, चित्र वर्णन करणे या कौशल्यांचा विकासासाठी हे पाहण्यासाठी आपणास एखादी प्रश्नोत्तर पत्रिका पीडीएफ देऊन मूल्यमापन करता येईल. अडचणींवर शंका समाधान, यासाठी गुगल लिंक देऊन, व्हिडिओ देऊन आनंद दायी पद्धतीने मूल्यमापन प्रक्रिया राबवता येईल. विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे, चाचणी घेतली जात आहे, त्यातून गुणदान मिळणार आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर न होता या मूल्यमापन चाचणीतून विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहन मिळेल व प्रेरणा मिळेल हा दृष्टीकोन ठेऊन मुल्यमापन प्रक्रिया राबवावी लागेल. यामुळे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया होण्यास मदत होईल. अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र व पुरक मार्गदर्शन करण्यास वस्तुनिष्ठपणे फायदा होईल.
आपल्या वर्गाच्या पटाचा विचार करून आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष फोनवर विद्यार्थ्यांशी बोलावे. किमान दररोज ५ ते १० विद्यार्थ्यांशी. सद्य परिस्थिती, आरोग्याविषयी, कोविड १९ विषयी, अभ्यासाची चौकशी करावी व मार्गदर्शन करावे. याचे नियोजन करावे. रोज किती विद्यार्थ्यांना फोन करावा लागेल हे ठरवावे.लागेल.
१००% विद्यार्थी डिजिटल ऑनलाइन मधून ऑफलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे. Work To Home Learn To Home संकल्पना आपण सर्वजण मिळून यशस्वी करण्याचा यशस्वी प्रयत्न करू या.

YES I CAN DO !!!! I WILL WIIN. !!!!!!

डॉ. विलास उमराश काळे
केंद्रप्रमुख केंद्र अरण ता.माढा जि. सोलापूर
मो.नं….९६८९१८८२८३

डिजिटल ऑनलाइन शिक्षणाचा ऑफलाइन विचार प्रवाह.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button