Yawal

यावल येथे आदी वासी दिवस साजरा

यावल येथे आदी वासी दिवस साजरा

( शब्बीर खान ) यावल
आमची संस्कृती ही बाई माणसाला जिवंत ठेवण्याची संस्कृती आहे. देशात मुलींचे प्रमाण कमी आहे, पण फक्त आदिवासींचे सर्वेक्षण केलं तर आदिवासींच्या १००० मुलांमागे १०२३ मुली जन्माला येतात. कारण मुली पोटात मारायची आमची संस्कृती नाही.आमच्या महिला आजही चुलीवर स्वयंपाक करतात, पण कधीही पदर पडून भाजल्या गेल्याच्या घटना घडत नाही. अशी आमची संस्कृती असून तिचे सर्वत्र गोडवे गायले जातात. असे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे .यांनी आज येथे केले.
येथे धनश्री चित्र मंदिरात आयोजित जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय मार्फत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत उपस्थित होते. प्रसंगी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर पाटील, एम.बी.तडवी, प्रकल्पस्तरीय समितीच्या माजी अध्यक्ष मीना तडवी, तहसीलदार महेश पवार, पालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, राजू तडवी, सहाय्यक सरकारी वकील अॅड. राजीव तडवी, दिलरुबाब तडवी, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, शिवसेनेचे हुसैन तडवी,मासूम तडवी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले. तत्पूर्वी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया जवळून आदिवासी बांधवांची रॅली धनश्री चित्र मंदिरापर्यंत निघून धनश्री चित्र मंदिरात दाखल झाली. प्रकल्प अधिकारी वीनिता सोनवणे यांनी प्रास्तावीक केले. यावेळी डॉक्टर अभिजीत राऊत, जि. प. चे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, एम.बी.तडवी यांची भाषणे झाली.आमदार शिरीष चौधरी म्हणाले, की लोकप्रतिनिधींनी जनतेच्या, आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. देश स्वातंत्र होऊनही आपण अज्ञान, व गरीबीच्या गुलामगिरीत जगत आहोत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांच्या हस्ते गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button