Amalner

Amalner: मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेने तर्फे विविध उपक्रम..!रक्तदानासह शालेय साहित्याचे वाटप…!

Amalner: मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेने तर्फे विविध उपक्रम..!रक्तदानासह शालेय साहित्याचे वाटप…!

मा.मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील जीवनश्री रक्तपेढ़ीत रक्तदान कार्यक्रमाने सुरवात झाली. त्यानंतर तांबेपुरा भागातील सी.आर.पाटील इंग्लिश मेडिअम स्कूल मधे विविध शासकीय योजना संदर्भात तीन दिवसाचे सुविधा कॅम्पचे आयोजन करण्यात आले.त्याचा शुभारंभ उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख व शहरप्रमुख संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तांबेपुरा तील वयस्कर व्यक्तीच्या हस्ते ना.शिंदेच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. उपशहरप्रमुख प्रवीण पाटील यांनी सदर कंँपचे आयोजन केले आहे.यात रेशनकार्ड नुतनिकरण,पगाराचा दाखला,जातीचा दाखला,इतर विविध दाखल्यांसंदर्भात सुविधा पुरावल्या जाणार आहे.

दुपारी अमळनेर तालुक्यातील बहादरवाड़ी येथील जिल्हापरिषद शाळेत गरीब विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप बालासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. बहादरवाड़ीचे सरपंच रामकृष्ण पाटील, उपसरपंच रमेश पाटील, शहर संघटक साखरलाल माळी, उपशहरप्रमुख प्रवीण पाटील, नगरसेवक महेश पाटील, युवा सेनेचे तालुकप्रमुख गुणवंत पाटील शहरप्रमुख भरत पवार, मुख्याध्यापक प्रकाश शिरसाठ बहादरवाडीचे भटू पाटील व इतर ग्रामस्थ हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button