Maharashtra

विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह येथे स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त बहिणीची अनोखी भेट”

विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह येथे स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त बहिणीची अनोखी भेट”     

विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह येथे स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त बहिणीची अनोखी भेट"

               

 चांपा प्रतिनिधी अनिल पवार 
चांपा :  विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह,अंबाझरी टेकडी नागपूर येथे  दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा गोंडवाना सोडूम महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगी दिनेश शेराम यांनी दुर्गम भागातील वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना राखी बांधून,लाडू भरवून ओवाळणी केली व शैक्षणिक विकासासोबत जगातील वेगवेगळ्या घडामोडी बघण्यासाठी व मनोरंजनासाठी वसतिगृहाला LCD TV  भेट देऊन बहिणीचे सामाजिक दायित्व पूर्ण केले.विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिन निमित्त प्रेरणादायी भाषण प्रस्तुत केले तसेच टाकावू वस्तू पासून राखी मेकिंग स्पर्धेत स्वयमस्पूर्थी ने सहभाग घेऊन मनमोहक राख्या तयार केल्या.याप्रसंगी वसतिगृह सचिव दिनेश  शेराम,गणेश करणायके,विजय परतेकी,लीना करनायके,राहुल साकोरे,स्वप्नील मसराम,ओम येटे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button