Amalner: अपघाताची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसवा…आम आदमी पार्टीची मागणी
अमळनेर- जानवे, लोंढवे, मंगरूळ सह धुळे रोडवर लहान मोठे अपघात नेहमी होत असतात…
या भागातुन शालेय विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते..
दुपदरी रस्ता असल्याने वाहने भरधाव असतात. ती नियंत्रित करण्या साठी जानवे ते मंगरूळ सह धुळे रोड वर जागोजागी गतिरोधक निर्माण करावेत अशी मागणी अमळनेर आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देताना आपचे तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील, डॉ रुपेश संचेती, शिवाजी दौलत पाटील, दिलीप बाबुराव पाटील, नंदू जगन्नाथ पाटील, अभिमन्यू पाटील, राहुल पाटील, प्रविण पाटील, किरण रतिलाल पाटील, भुपेंद्र पाटील, नितीन पाटील, किरण पाटील,पवन पाटील, आकाश पाटील, आदी उपस्थित होते.






