Amalner

Amalner: धनदाई महाविद्यालयात म्युझिकल योगा शिबीर ..नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

Amalner: धनदाई महाविद्यालयात म्युझिकल योगा शिबीर ..नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

अमळनेर प्रतिनिधी- येथील धनदाई महाविद्यालयात डॉ. उज्ज्वल कापडणीस निर्मित
म्युझिकल योगाचे धडे दिले जात आहेत.गेल्या तीन वर्षांपासून कोरोना संकट काळात व काही कारणास्तव म्युझिकल योगा बंद करण्यात आला होता. मात्र नविन वर्षात १ जानेवारी २०२३ पासून दररोज पहाटे ५:४५ वाजता सुरू (४० मिनिटे) श्री. युवराज पाटील सर यांच्या प्रात्यक्षिक मार्गदर्शनाने विनामूल्य संगितमय योगा
शिकविला जात आहेत.
यात शास्त्रशुध्द पध्दतीने परमात्मा स्मृतीमध्ये गीत संगीताच्या तालावर हा योगा ४० मिनिटे घेतला जातो. या रोगासाठी ढेकू रोड, पिंपळे रोड परिसरातील तसेच अमळनेरातील अनेक नागरिक लाभ घेत आहेत.

योगामुळे संपूर्ण शरीर सुदृढ होते व निरोगी राहते.तसेच मन सुध्दा आनंदी राहते. पूर्ण दिवस आंनदात जातो. सकाळच्या प्रसन्न वेळेचा लाभ उपस्थितांना मिळतोनियमित योगा केल्याने बुध्दीची एकाग्रता वाढण्यास खूप मदत होते. या संगीतमय डान्सिंग योगामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून शारिरिक व मानसिक
व्याधी चांगल्या होतात.
तरी या संगीतमय योगाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन योग शिक्षक श्री युवराज पाटील व रविंद्र पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button