Dhule

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे च्या वतीने कोविड 19 जनजागृती अभियान ची सुरवात न्याहळोद गावातून संपन्न …

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे च्या वतीने कोविड 19 जनजागृती अभियान ची सुरवात न्याहळोद गावातून संपन्न …

असद खाटीक

सध्या कोरोना काळात ग्रामीण भागातील जनतेला कोरोना विषयी जनजागृती व्हावी या साठी कोविड 19 जनजागृती अभियानाची व्यापक संकल्पना मनविसे प्रदेश अध्यक्ष मा.श्री आदित्य शिरोडकर साहेब यांनी मांडली होती त्या संकल्पने नुसार व मनविसे उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री मनोज रामराजे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनजागृती अभियानाची सुरुवात न्याहळोद येथील ग्रामीण आदिवासी भागातून मनविसे च्या वतीने करण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सुरेश काकुळदे उपस्थिती होती यावेळी डॉ कुकळदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कोविड विषयी अति आत्मविश्वास तसेच आत्मविश्वास गमावणे या दोघी गोष्टी धोक्याच्या आहे कोरोना प्रथम टप्प्यात बरा होऊ शकतो जर तुम्हाला लक्षण असतील तर अंगावर न काढता डॉक्टर कडणा त्याबाबतीत तपासणी करणे आवश्यक आहे योग्य उपचारामुळे पुढील धोका टळू शकतो तसेच तापमान व ऑक्सिजन याची आपल्या शरीरासाठी कमाल किमान आवश्यकता किती व किती ऑक्सिजन कमी झाल्याने व तापमान कितीने वाढले की आपण तपासणी करावी या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांची थर्मलमीटर ने तापमान तसेच ऑक्सिमिटर ने ऑक्सिजन ची तपासणी करण्यात आली तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन सी च्या गोळ्या वाटप करण्यात आल्या यावेळी सामाजिक अंतर राखण्यात आले तसेच भविष्यात जिल्ह्याभरात हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे मनविसे तर्फे मांडण्यात आले यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष श्री प्रसाद सतीश देशमुख व सचिव गौरव गीते यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हाध्यक्ष मनोज शिरसाठ तालुका सचिव नितीन कोळी आदींनी केले होते ..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button