शेरशहा ठरला या वर्षीचा ब्लॉकब्लास्टर..97% प्रेक्षकांच्या पसंतीस..
आय एम डी बी IBDB च्या रेटिंग नुसार सर्वात जास्त रेटिंग मिळाली आहे. आता पर्यंत बॉलिवूड मधील सर्वात जास्त रेटिंग मिळालेला हा दुसरा सिनेमा ठरला आहे.
Amazon प्राईम व्हिडिओवर १२ ऑगस्टला प्रदर्शित झालेला शेरशाह इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटाने लोकांची मने जिंकली आहेत. तसेच चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाची चाहते आणि समीक्षक तितकेच कौतुक करत आहेत.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट असून त्याच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. सध्या ‘शेरशाह’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. ‘शेरशाह’ या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
शेरशाह चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धनने केले असून निर्मिती करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शन केली आहे. करण जोहरचा हा अॅमेझोन प्राइमसोबतचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी व्यतिरिक्त शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद्य, शाताफ फिगर आणि पवन चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत. शेरशाह २ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृह बंद झाले आणि चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते.






