Maharashtra

?अमळनेर कट्टा… अखेर सोमवार चा जनता कर्फ्यु रद्द..!व्यापाऱ्यांनी घेतली उपविभागीय अधिकारी यांची भेट..!

?अमळनेर कट्टा… अखेर सोमवार चा जनता कर्फ्यु रद्द..!व्यापाऱ्यांनी घेतली उपविभागीय अधिकारी यांची भेट..!

अमळनेर येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी सोमवारी जनता कर्फ्यु सुरू ?करण्यात आला होता. या संदर्भात व्यापारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्र शासनाने मिनी लॉक डाऊन करण्याचा निर्णय 5 एप्रिल रोजी घेतला आहे. या नुसार अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने आस्थापना 5 एप्रिल पासून 30 बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापारी वर्गाने निषेध व्यक्त केला आहे. यावर लवकरच महाराष्ट्र शासन नवीन नियमावली जाहीर करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान आज अमळनेर शहरातील विविध व्यापारी वर्गाने आज आपले गाऱ्हाणे माजी आमदार स्मिता पाटील यांच्या कडे मांडले .या संदर्भात निकुंभ हाईट्स येथे बैठक झाल्या नंतर व्यापारी शिष्टमंडळाने स्मिता पाटील यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात चर्चा केली. या चर्चेत शनिवार व रविवार विक एन्ड लॉक डाऊन नंतर सोमवारी असलेला जनता कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. तसेच व्यापारी वर्गाने प्रत्येकाने कोव्हिडं टेस्ट करावी,लसीकरण करून घ्यावे,काम करणारे कर्मचारी यांच्या ही चाचण्या करून घ्याव्यात, योग्य ती खबरदारी घ्यावी, नियमांचे पालन करावे,सॅनिटायझर, मास्क,कोव्हिडं शिल्ड चा उपयोग करावा,फिजिकल सोशल डिस्टनगसिंग ठेवावे,दुकानात गर्दी होऊ देऊ नये इ सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button