Navapur

शेतकऱ्यांची वीजतोडणी मोहीम बंद न केल्यास आंदोलन, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेची निवेदनातून मागणी

शेतकऱ्यांची वीजतोडणी मोहीम बंद न केल्यास आंदोलन, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेची निवेदनातून मागणी

नवापूर : शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी ताबडतोब बंद करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी यांना सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की राज्य शासनाने अधिवेशन संपविल्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याची स्थगिती उठवली. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांकडून थकीत वीज बील वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे.
३१ मार्चनंतर थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी वापर केलेली वीज व दिलेले बिल यात जमीन- असमानाचा फरक आहे. शेतकऱ्यांच्या शेतात वीज रीडींग न घेता अंदाज पंचे वीज बिले ही शेतकऱ्यांना पाठविण्यात आले. चुकीची वसुली व वीज कनेक्शन तोडणी लवकरच थांबवावी अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत निवेदनात देण्यात आला. निवेदनावर किशोर ढमाले, आर टी गावित, होमबाई गावित, जगन गावित, जेका गावित, गोबजी गावित, गेवाबाई गावित, विक्रम गावित सह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Back to top button