Pune

श्रमिक पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी सुरेश मिसाळ तर कार्याध्यक्ष पदी देवा रांखुडे यांची निवड

श्रमिक पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी सुरेश मिसाळ तर कार्याध्यक्ष पदी देवा रांखुडे यांची निवड

पुणे दत्ता पारेकर

पुणे-श्रमिक पत्रकार संघाची इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबलसरांच्या सुचने नुसार इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणी व अध्यक्ष निवडीची मिटिंग लाखेवाडी येथील भवानी गड येथे घेण्यात आली होती.

यावेळी सभासद नोंदणी करून अध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष पदासाठी सुरेश श्रीहरी मिसाळ यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्याने मिसाळ यांची इंदापूर तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष निवडी नंतर अध्यक्ष तसेच उपस्थित सर्व सदस्याच्या एकमताने तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुका उपाध्यक्ष पदी तात्यासाहेब घाटे, कार्याध्यक्ष पदी देवा राखुंडे,सचिव पदी सत्यजीत रणवरे, संघटक पदी शिवाजी पवार व प्रसिद्धी प्रमुख पदी विजय शिंदे यांची निवड करण्यात आली.

यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा, संतोष दहिदुले, विश्व वारकरी सेना भारत पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब उगलमोगले,
इम्तिहाज मुलाणी, प्रतापसिंग रजपुत, कैलास पवार,सचिन खुरंगे, आदि पत्रकार बाधंव उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष सुरेश मिसाळ यांनी सांगितले की कृष्णकांत कोबलसरांच्या विचारांना अंगीकारुन त्यांच्या सुचना नुसार पुढील काळात वाटचाल करण्यात येईल. अध्यक्षांसह कार्यकारिणी मध्ये निवड झालेल्या सदस्याचा या वेळी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर सर्व कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन भवानीगड लाखेवाडी येथे विश्व वारकरी सेना भारत पुणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब उगलमोगले, इम्तिहाज मुलाणी, सचिन खुरंगे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button