Jalgaon

?️ महत्वाचे..विद्यापीठाच्या पदव्युतर अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदतवाढ

?️ महत्वाचे..विद्यापीठाच्या पदव्युतर अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदतवाढ

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांसाठी केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत १२ डिसेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती अध्यक्ष प्रा. ए.बी. चौधरी यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने व शैक्षणिक हित लक्षात घेता सदर केंद्रिय प्रवेश प्रक्रीयेद्वारे विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयात एम.एस्सी. (सर्व विषय) आणि एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष प्रवेशकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १२ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती व नोंदणी अर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

विद्यार्थ्यांनी नोंदणी ३०० रूपये शुल्क ऑनलाईन द्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी अर्ज आता दि. १२ डिसेंबर, २०२० पर्यंत भरता येतील. ऑनलाईन भरलेल्या अर्जांचे ई-व्हेरीफिकेशन १३ डिसेंबर, २०२० पर्यंत होईल. प्रवेश नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दि. १४ डिसेंबर, २०२० रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर काही आक्षेप असल्यास ते दि. १५ डिसेंबर, २०२० पर्यंत एआरसी कडे ई-मेलद्वारा नोंदवता येतील. दि.१६ डिसेंबर,२०२० रोजी अंतीम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर प्रवेशासाठी पहिली, दुसरी, व तिसऱ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. तरी वरील अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट देवून सविस्तर माहिती समजून घ्यावी असे आवाहन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा. ए.बी. चौधरी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button