Nashik

व्ही. एन. नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

व्ही. एन. नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी: क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन आयोजित करण्यात आला . प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंदापूर तालुका ग्राम प्रतिष्ठानचे विश्वासराव रणशिंग महाविद्यालय कळंब, पुणे येथील डॉ. विलास बुवा हे उपस्थित होते. डॉ. बुवा यांनी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभाग घेतलेला विदयार्थी हा सामजिक भान व भावना जोपासणारा विदयार्थी म्हणुन घडल्या शिवाय राहत नाही असे प्रतिपादीत केले. तसेच श्रम संस्कार शिबिरातून चांगला व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मदत होते व त्यातून कर्तृत्व सिद्ध करता येते असे नमूद केले. अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी राष्ट्र निर्मितीत विद्यार्थ्यांचे फार मोठे योगदान असून सामाजिक जान व जागृती असणाऱ्या विद्यार्थ्यांशीवाय समाज प्रगत होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नाना चव्हाण, प्रा. पंकजा अहिरे, प्रा. वैशाली गांगुर्डे, डॉ. रुपाली सानप तसेच विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नाना चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. पंकजा अहिरे आणि आभार डॉ. संतोष भैलुमे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button