Chandrapur

गडचांदूर कोरपना तालुक्यात नागरिकांना सतर्कतेचा तर केले आव्हान

गडचांदूर कोरपना तालुक्यात नागरिकांना सतर्कतेचा तर केले आव्हान

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

संपूर्ण जगभरात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात सर्वच जिल्ह्यांध्ये आणि शहरांध्ये खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
या काळात कोणत्याही कार्यक्रमाला, मोर्चाला, सभेला परवानगी मिळणार नाही. ‘कलम 144’ म्हणजे जमावबंदी हा संबंध जोडला जात असला, तरी यावेळी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीसाठी हे कलम लागू करण्यात आले आहेत, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, सार्वजनिक जागी किंवा समारंभात जाणे टाळावे, असं आवाहन केलं आहे.

तसेच कोरोना व्हायरस संदर्भात स्थानिक गडचांदूर कोरपना पोलिस व नगरपरिषद व कोरपना नगरपंचायत प्रशासन,ठाणेदार, मुख्याधिकारी,न.प.अध्यक्षा व उपाध्यक्षांनी कोरोनाला घाबरू नका काळजी घेण्याचे जनतेला आव्हान केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button