Maharashtra

शहरातील व ग्रामीण भागातील मडकी घडणार कुंभारावर आली उपासमारीची वेळ

शहरातील व ग्रामीण भागातील मडकी घडणार कुंभारावर आली उपासमारीची वेळ

रजनीकांत पाटील

अमळनेर : जगभरात कोरोना सारख्या आजराने आहाकार माजवला आहे. संपूर्ण जग लॉक डाउन झाला आहे. अशा या आजाराने हातावर पोट धरत कष्ट करणाऱ्या आमजनतेला जगणे मुश्किल झाले आहे.
जो कुंभार दिवसरात्र रक्ताचे पाणी करतो वर्षे भर मडकी घडवतो आज त्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे.
उन्हाळा सुरू झाला की लागणाऱ्या घामाच्या धारा उन्हाच्या झरामुळे थंड पाणी पिण्याची इच्छा होते असते.
साध्या पाण्याने तहान पूर्ण होत नसल्याने पारंपरिक पद्धतीने थंड होणाऱ्या मडक्यातील पाण्याकडे नागरिक आकर्षित होत असतात. उन्हाळ्याच्या दिवसात लागणारे थंड पाणी पिण्यासाठी आपण दर वर्षी उन्हाळ्यात एक नवीन मडकी घेत असतो. आज च्या काळात ते गरीब जनतेच फ्रीज असते. अध्यापही काही लोकांना घरात असलेल्या फ्रीजच्या पाण्याची ऍलर्जी होत असते. त्या मुळे काही लोक कुंभाराकडून मडकी आणतात पाणी थंड करून पितात मात्र दिवस रात्र कष्ट करणारा शेतकरी आपल्या शेतात मडकी चा वापर करतात. मात्र या सध्याच्या या लॉक डाउन च्या बिकट परिस्थिती त शहरातील जनतेला घरातून बाहेर पडता येईना व कुंभाराला आपला माल शहरात विकण्यासाठी घेऊन देखील जात येईना ना गावात डोक्यावर मडकी घेऊन विकता येईना. अशी वेळ कुंभारावर आली आहे.
अशा परिस्थितीत कुंभाराचा माल पडून च आहे. हातात येणार दोन पैसा त्यात थोडे का पोट भरना आता च्या स्थितीत कसा पैसा येईल आपला उदरनिर्वाह कसा होईल या बाबत चिंता कुंभारच नाही.तर हातावर पोट धरून चालणाऱ्यांन कडून देखील व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button