Amalner: रणधुमाळी 2024: मंत्री असून गौण खनिज उपसा करणारा,शासनाचे कोट्यावधी रू. बुडवणारा आमदार जनतेला हवा का?… डॉ रवींद्र चौधरी
अमळनेर शासनाने मनाई केलेल्या अवैध गौण खनिज उपसा मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने केला आहे. शासनाचे कोट्यावधी रु. मंत्री अनिल पाटील यांनी बुडवले आहेत.अनिल पाटील यांनी मौजे देवगाव ता अमळनेर जि जळगाव येथे गट नं 83 येथे अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे असून जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्रा द्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत शिरीष दादा मित्र परिवाराने सूतगिरणीचा विषय छेडून अनिल पाटील यांनी खाजवून खरुज काढली आहे असा प्रतिटोला लगावला आहे.
जळगांवचे जिल्हाधिकारी यांनी अनिल पाटील यांना नोटीस बजावली असून त्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे.त्यांनी इतरांवर खोटे आरोप करून नाक लावू नये. “चौकीदार चोर है” हे वाक्य अनिल पाटील यांचे गौण खनिज प्रकरणामुळे खरे ठरत आहे. आता मंत्री अनिल पाटील का बोलत नाहीत? शिरिषदादा चौधरी यांनी सूतगिरणी प्रकरणी जे सत्य आहे ते स्पष्ट मांडून खुलासा केला. मंत्री असून गौण खनिज उपसा केला व शासनाला फसवले असा आमदार हवा का? असा सवाल डॉ रविंद्र चौधरी यांनी विचारला आहे.
अनिल पाटील उत्तर द्या.. असे सरळ आव्हान डॉ रवींद्र चौधरी यांनी केले आहे.






