Amalner: विप्रो कंजूमर केयर आणि आधार बहुउद्देशीय संस्थे तर्फे शालेय विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी.. मोफत चष्मे वाटप..!
अमळनेर (प्रतिनिधी) विप्रो कंजूमर्स केयर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेने तालुक्यातील सुमारे ५ हजार शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी
करून मोफत चष्मे वाटप आणि उपचार सुरू करून नव्या पिढीतील दृष्टिदोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
विप्रो कंझुमर्स केयर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांनी संयुक्त मोहीम राबवून अमळनेर तालुक्यातील पिळोदा, अंतुर्ली, रंजाणे, धार, मालपूर, अमळगाव, पिंपरी, पिंगळवाडे, चिमनपुरी ,पिंपळे खुर्द, पिंपळेबुद्रुक, मंगरूळ,दहिवद,
सारबेटे, फापोरे, गडखाम्ब, पातोंडा, जानवे रणाईचे मारवड लोंढवे आदी गावातील
विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली. विप्रोचे जनरल मॅनेजर विजय बागनिलेवाले, वेल्फेयर ऑफिसर सुधीर बडगुजर, स्टोअर परचेस मॅनेजर मिलिंद मरकंडे, अकाउंट मॅनेजर आनंद निकम, डॉ. पंकज पाटील, आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील रेणुप्रसाद, दीप्ती गायकवाड, मोहिनी पाटील निकिता पाटील, नंदिनी मैराळे, मयूर गायकवाड,
जितेंद्र पाटील यांनी मुलांची मोफत तपासणी करून दृष्टी दोष असणाऱ्याना उपचार व चष्मा मोफत वाटप सुरू केले आहे.






